0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
राज्यातील राजकीय परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे. जनतेने महायुतीला कौल दिला मात्र त्यांचे मुख्यमंत्री पदावरुन त्यांचे बिनसले. भाजप सत्ता स्थापन करण्यात निष्फळ ठरले. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिले. काँग्रेस राष्ट्रवादीने ऐनवेळी पाठिंबा पत्र न दिल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली. आता राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. जर तेही सरकार स्थापन करु शकले नाही. तर शिवसेना पुन्हा भाजपशी सत्तास्थापनेबाबत चर्चा करेल आणि भाजपही त्याला प्रतिसाद देईल, अशी शक्यता आहे. यानंतर शिवसेना भाजपचे पॅचअप होण्याची शक्यता आहे.

Post a comment

 
Top