0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुबंई |
मुबंई पुणे मार्गावर बोरघाटात बसचा अपघात आहे. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. बोरघाटात गारमाळ पाँइंट जवळच्या वळणावर बसचा ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली. दरम्यान देवदुत, महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी टिमचे मदतकार्य सुरु आहे. या अपघातात 2 वर्षाचा चिमुकला, एक युवती, एक पुरुष एक महीला जागीच ठार झाले आहेत. तर अंदाजे 30 प्रवासी यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम कामोठे, खोपोली रुग्णालय, पवना रुग्णालय, लोकमान्य रुग्णालय येथे जखमींना हलवण्यात आले आहे.

Post a comment

 
Top