0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्रातील एकूण आठ संस्थांना  केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या 5 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार -2019’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव ज्योत्स्ना सिटलींग आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)चे संस्थापक मिलींद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते. देशातील प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’ अंतर्गत आज एकूण चार श्रेणींमध्ये देशातील 36 संस्थांना सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एकूण 8 संस्थांचा समावेश आहे.या पुरस्कारांना ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. अ श्रेणीमध्ये तीन उपश्रेणी करण्यात आल्या होत्या.  याअंतर्गत ‘अ 1’ या उपश्रेणीत 1 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीची गुंतवणूक असणाऱ्या उद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीमध्ये पुण्यातील लोहगाव परिसरातील ‘अर्ली फुड्स प्रा.लि.’ चा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक शालिनी कुमार आणि विजयालक्ष्मी नागराज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2016 मध्ये स्थापन झालेली ही संस्था मुलांसाठी ऑर्गनिक बिस्कीट तयार करते. स्थानिक महिलांना या उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

Post a comment

 
Top