0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
येथील इस्माईल इमारतीला आज पहाटे आग लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे कळताच त्यांनी आग्नशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन जवानांनी इमारतीतील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले असून अजूनही बचावकार्य सुरूच आहे. ही आग कशामुळे आग लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, या घटनेमुळे परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले.

Post a comment

 
Top