0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सातारा-सांगली जिल्ह्यातील ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी अनेक गावांना आणि शेतकऱ्यांना भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरेंना एक अनपेक्षित अनुभव आला. एका शेतकऱ्याच्या मुलीने त्यांच्याकडे घरी येण्याचा हट्ट धरला. यानंतर ठाकरेंनीही मोठ्या मनाने तिच्या घरी जाऊन तिचा हट्ट पुरवला. काटेवाडी गावातील भानुदास कोरडे या शेतकऱ्याच्या लेकीने हा हट्ट धरला होता. यावेळी या कुटुंबाचं शिवसेनेविषयीचं प्रेम पाहून उद्धव ठाकरे भारावून गेले.

Post a comment

 
Top