0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणी सर्वंकष चौकशी करून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितले. मृत विजय सिंह यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.या प्रकरणात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षकासह पाच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुढे चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कड़क कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Post a comment

 
Top