0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे । 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जखमी वारकऱ्यांच्या भेटीला, मृतांच्या नातेवाईकांना भाजपकडून 5 लाखांची मदत जाहिर करण्यात आली आहे. जखमी वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च भाजप करणार असल्याची माहिती यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.दरम्यान, दिवे घाटात वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला. या अपघातामध्ये दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर हडपसरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जेसीबी दिंडीत घुसल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये नामदेव महाराजांच्या सतराव्या वंशजाचाही समावेश आहे.

Post a comment

 
Top