0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश मिळून भाजप व शिवसेना या दोन्ही दिग्गज पक्षांमध्ये सत्तावाटपावरून संघर्ष चिघळल्याचे दिसून येत आहे. 50-50 फॉर्म्युल्यापासून तसूभरही न ढळलेल्या शिवसेनेला धोबीपछाड देण्याची तयारी भाजपने चालवली आहे. यामुळेच भाजपने आता शिवसेनेच्या मागण्या न जुमानता 'एकला चलो रे' भूमिका स्वीकारली असून शपथग्रहण समारंभाची तयारीही चालवली आहे. सूत्रांनुसार, मंगळवारी, दि. 5 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी शिवसेना सोबत असेल तर ठीक, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथग्रहण समारंभा पार पाडण्याचा निर्धार भाजपने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Post a comment

 
Top