0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
गेली 15 वर्षे मुरबाडचा ट्रामाकेअर सेन्टर इमारतीचे काम सुरू असुन अपुर्ण कामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुरबाडचे उपविभागीय अभियंता,शाखा अभियंता ठेकेदाराना संपुर्ण निधी काढून गैरव्यवहार केला आहे.मुरबाड माळशेजघाट माथ्यावर 80 किलोमिटर अंतरावर मोठया प्रमाणात आपघात होत आहेत.
त्यावर उपौचार करण्यासाठी मुरबाड तालुक्यात आरोग्य यंत्रणा सुविधा इमारत डॉक्टर नसल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधी आपघाती रूग्णांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत.मुरबाड ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हाग्रामीण रूग्णालयाचा दर्जा दिला मात्र कोटयावधीच्या नुसत्या इमारती बांधल्या बांधकाम इमारतीवर खर्च करून विकास झाल्याचा भाजपासेना सरकारचा दावा असून बोगस निकृष्ट अपुर्ण कामाकडे दुर्लक्ष कशासाठी असा सवाल नागरिक करत आहेत.आरोग्य विभागाचे सिव्हीलसर्जन,उपसांचालक,संचालक,आरोग्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग ,ठाण्याचे अधिक्षिक अभियंता,कार्यकारी अभियंता,उपअभियंता,शाखा अभियंता यांनी मुरबाड शहरात ट्रामाकेअर सेन्टरचे खोटे मोजमाप,इस्ट्रीमेन्ट,मुल्यांकन,टेंडर मॅनेज करून लाखो रूपायाचा भ्रष्टाचार केला आहे.
नुकत्याच मुरबाड माळशेजघाट रस्त्यावरील खरब्याचीवाडी येथे दोन एसटी बसचा आपघात झाला त्यामध्ये 15 जण जखमी झाले त्या आपघातग्रस्ताना उल्हासनगर कल्याण येथे उपौचारासाठी घेऊन जावे लागले ट्रामाके्रअर सेन्टर असते तर रूग्णांवर तात्काळ उपौचार झाले असते असा संताप नागरिकांनी व्यक्त करून इमारतीने विकास झाला पण रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.असे बोलले जातंय मुरबाडमध्ये मुख्यमंत्री आले भरपावसाळयात त्यावेळी मुरबाड शहारातील सर्व बांधकाम विभागाची कामे पुर्ण झाल्याचे खोटे आहवाल तयार करण्यात आले.विश्रामगृहाचा टेंडर इस्टीमेन्ट खोटा बनवला मात्र कामे अपुर्ण असताना कोटी रूपये हाडप केले.सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता तपासणी करून गेले त्यानीही भ्रष्टाचाराला दडपण्याचा प्रयत्न केला या सर्वाची चौकशी करून कारवार्इ करावी अन्यथा उपोषण आंदोलनाचा मार्ग नागरिक स्विकारतील असा इशारा देण्यात आला आहे.

Post a comment

 
Top