0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे  |

सरकारच्या आश्वासनाची मनसेने खिल्ली उडवून शहरात फक्त आश्वासनांचा पाऊस सुरू आहे. विकासकामांसाठी साडेसहा हजार कोटी रुपये निधी, 27 गावांची वेगळी नगरपालिका आणि नुकतेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत साडे चारशे कोटीचे रस्ते मंजूर झाल्याची घोषणा केली. मात्र, कोणतेही ठोस काम झाले नाही. डोंबिवलीकर विविध समस्यांनी त्रस्त असून त्यांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्याचा निषेध म्हणून मनसेने विडंबनात्मकरित्या विमानतळाचे भूमिपूजन केले.

Post a comment

 
Top