0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
बँक गैरव्यवहारप्रकरणात सर्वात जास्त छापे महाराष्ट्रात टाकण्यात आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सात हजार कोटी रुपयांच्या 35 बँकांतील घोटाळ्यांप्रकरणी देशभरातील 16 राज्यांतील 190 पेक्षा जास्त ठिकाणी मंगळवारी एकाच वेळी छापे घातले. या कारवाईसाठी सीबीआयने तब्बल 1 हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. यामधील सर्वाधिक छापे महाराष्ट्रात घालण्यात आले आहेत.सीबीआयकडे 35 बँकांशी संबंदित गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये अलीकडेच दाखल झालेल्या 42 नव्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. या तपासासाठी सीबीआयने मंगळवारपर्यंत देशातील विविध शहरांमधील 190 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याणचाही समावेश आहे. सर्वात जास्त छापे महाराष्ट्रात घालण्यात आले आहेत. राज्यातील 58 ठिकाणी सीबीआय पथके पोहोचली होती. तर, दिल्लीमध्ये 12, तमिळनाडू व मध्य प्रदेशात प्रत्येकी 17, उत्तर प्रदेशात 15, आंध्र प्रदेशात पाच, चंडीगड येथे दोन, केरळमध्ये चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

Post a comment

 
Top