0

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
सार्वजनिक बांधकाम विभागात कुठंतरी भ्रष्टाचाराचा पाणी मुरतयं.विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता यांची बघ्याची भुमिका व नेत्यांचा आशिर्वाद पाठिला,बोगस कामांवर निधी काढला अन गुठरी दिली नेत्यांच्या हातमिलवणी गाठीला ’’
काल पर्यंत जे सोमे गोमे नेत्यांच्या मागे होते तेच आज सार्वजनिक बांधकाम विभागात येऊन नेत्यांच्या आशिर्वादाने पुढे गेले व नेता मागे राहिला.टेंडर  ठेकेदार हा आमदार ,खासदार यांच्या पत्राचा,शिफारसीचा आधार घेतांना दिसत असून मालामाल होण्यासाठी खालच्या अधिकार्‍यांपासून वर्कआर्डर बनविणार्‍या तसेच कार्यकारी अभियंता यांचेपर्यंत टक्केवारी समोर ठेवतो तर काही कॅशचाही वापर होतोच.आणि याच टेंडर कामांचा बोगसपणा कोणाला कळून येत नसून ऑफलार्इनचा प्रकार केला जातो.पुन्हा पुन्हा त्याच त्याच कामांवर टेंडर पडतो तर कधी तीन  लाखांची कामे घेऊन कामे न करता बिले काढून भ्रष्टाचार केला जातो.मुरबाड मध्ये सध्यातरी तशीच अवस्था आहे.काही शिक्षकच ठेकेदार झाले तर काही उच्च्य ठेकेदार भ्रष्टाचार झाले.यामध्ये सर्वात घोळ ठेकेदार करित असून मुरबाडच्या व शहापूरच्या सोसायटीच्या नावाने कामे घेऊन लबाडगिरी कार्यक्रम केला जात आहे.मुरबाड तालुक्यात सोसायटयांच्या नावे निकृष्ठ पध्दतीचे भ्रष्टाचारी कामे  गेली आहेत तर काही सोसायटया काळया यादीत जाण्याच्या मार्गावर असतांना टक्केवारीने अधिकार्‍यांना बांधून घेतले आहे.बोगस कामांची बिले देऊन शासनाला शेंडी लावून शासनाचा पैसा हडप करण्याचा कारनामा मुरबाड सोसायटया करित आहेत.सोसायटयांच्या नावे कामे घेतली जातात परंतू निकृष्ठ पध्दतीचे कामे करता व काही ठिकाणी तर विनाकामाचे बिल काढले अशा सोसायटयांची प्रथम  करून मुरबाड,शहापूरच्या सर्व सोसायटयांना काळया यादीत टाकण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.Post a comment

 
Top