0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 15 ऑक्टोबरपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. यासंदर्भात काही सूचना असल्यास पालक व शिक्षक संघटनांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. या सुचनांचा विचार करून राज्य शिक्षण मंडळाने जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकात बदल करून त्याला अंतिम स्वरुप दिले आहे.यामुळे आता राज्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या बारावीच्या परीक्षेची सुरुवात 18 फेब्रुवारी 2020 ला होणार आहे तर ही परीक्षा 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे.माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीच्या (नवीन पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार) परीक्षेची सुरुवात 3 मार्च 2020 ला होणार असून, ही परीक्षा 23 मार्चपर्यंत चालणार आहे. यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध केले आहे.


Post a comment

 
Top