0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शिवाजीपार्कवर भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेच सिेद्धिविनायकाचे सहकुटूंब दर्शन घेतले. त्यानंतर ते पहिल्या कॅबिनेट बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर रवाना झाले. या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील दिग्गज नेतेही उपस्थित होते. पहिल्या कॅबिनेट बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते.दरम्यान, रायगडाच्या विकासासाठी 20 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शेतऱ्याला तुटपुंजी मदत करणार नाही तर भरीव मदत करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शेकऱ्यांना आनंद होईल इतकी मदत त्यांना करण्यात येईल. राज्याच्या मुख्य सचिवांना आतापर्यंत शेतऱ्यांना किती रक्कम देण्यात आली याची माहिती काढण्यास सांगितले आहे. ते समोर आले की लगेच शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Post a comment

 
Top