0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
लोकप्रतिनिधी व मंञ्यांच्या मिलीभगतने त्याचौकशीवर पडद्दा घातला.सार्वजनिक बांधकाम विभागाला आग लागली कि लावली तेच स्पष्ट न करता निवडणूकीच्या सणात सर्व विसरून गेल्याचे  चित्र समोर येत आहे.जोमाशोमाने सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2 च्या कार्यालयाचा नवा लुक तयार करावयास घेतला असून मागील बाजूस तर चक्क नवा बांधकाम सुरू केला आहे.कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली ठाणे जिल्हयातील सर्व कामे होतात मग रस्ता पुर्ण नसताना ताशोरे न मारता संपुर्ण बिल कसे काढले जाते यावर जनतेला प्रश्‍न पडला आहे.गावात रस्त्याचा निधी ठेकेदार बिना काम करता खा खा खातो आणि खालसपासून वर्कऑर्डर बनविणार्‍यापर्यंत तसेच कार्यकारी अभियंतापर्यंत टक्क्यांचा पाऊस पाडतो.
काही ठिकाणी तर टेंडर न होता रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन केले गेले,ठेकेदार ठरवले आणि टक्केवारीचाही साटेलोट झाला.ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात मुरबाड-म्हसा-कर्जत रस्त्याचा विषय आणि र्इडी चौकशी तर त्याच रस्त्यावर पुन्हा निकृष्ट काम तेही निकृष्ट दर्जाचा सुरू आहे त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ते महाराष्ट्र शासन पर्यंत तक्रार केली असून सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे चे अभियंता,कार्यकारी अभियंता,मुरबाड उपअभियंता,शाखा अभियंताची,ठेकेदार यांची सी.आय.डी.मार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.ठाणे जिल्हयात सार्वजनिक बांधकामांतर्गत कामे,जिल्हापरिषद अंतर्गत कामामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे.कालपर्यंत अधिकार्‍यांकडे मोटार सायकली होत्या आज त्यांच्याकडे मोठ मोठया गाडया आल्याने शासनाने प्रथम त्यांच्या अधिकार्‍यांची  र्इडी चौकशी लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(भाग - 2) (क्रमशः - पुढिल भागात घोळ करणार्‍या सोसायटयांची पोलखोल)

Post a comment

 
Top