0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – नवीदिल्ली |
सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून बैठकी सुरू असून आज दिवसभर राष्ट्रवादी काँगे्रस व काँगे्रस यांच्या बैठका होत असल्याचे समोर आले आहे.ही बैठक सध्या खातेवाटपाची होत असल्याचे कळते.सत्तेच्या केंद्रस्थानी असलेले महाराष्ट्राचे राजकारणातील बादशाहा म्हणून शरद पवार यांचे नाव चर्चेत राहिले आहे.शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.त्यामुळे सर्वांच्या समोर हे गणित काय आणि ही वजाबाकी होती कि अधिक हे समीकरण समोर येतात तद्नंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँगे्रस व काँगे्रस असे एकून दोन पक्ष मिळून 15 नेते बैठकीसाठी आले आहेत.त्या बैठकीला दिड तास झाले असून दोन तासाचा पल्ला पुर्ण करणार असल्याचे समोर येत आहे. यामध्ये शरद पवार व सुप्रियातार्इ सुळे यांचा अचानक सहभाग आला आहे.महासेना आघाडी स्थापना येत्या 5 ते 6 दिवसात होणार असल्याची चर्चा आहे.शरद पवार यांच्या निवास्थानाबाहेर 150 च्या आसपास मिडीया पत्रकार असून बातम्या कव्हरींग करत आहेत.काही क्षणातच बैठक संपणार असून बैठकी अगोदर काँगे्रसने लवकरच चांगली बातमी समोर येणार असल्याचे सांगण्यात आले होते.


Post a comment

 
Top