0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |
मुलींना आपलं सौंदर्य हे सर्वात प्रिय असतं. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते, त्यात एखाद्या मुलीला आपल्या केसांवर असलेले प्रेम तर विचारायलाच असं असतानादेखील औरंगाबादच्या एका 19 वर्षीय तरुणीने आपले केस कॅन्सर ग्रस्तांसाठी दान केले. किरण गीते असं या धाडसी मुलीचं नाव आहे किरण गीते ही तरुणी औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयात पत्रकारितेचं शिक्षण घेत आहे. किरणच्या मैत्रिणीला कॅन्सरचा आजार आहे. त्या आजारात किमोथेरपी घेताना तिच्या डोक्यावरील सर्व केस तिला काढावे लागले .आपल्या मैत्रिणीचे असे हाल पाहून तिला नेहमी दु:ख व्हायचं. आपण यासाठी काही करू शकतो का, असा प्रश्न किरणला अनेक वेळा पडला. त्यातच एका वर्षाआधी कॅन्सर ग्रस्तांसाठी केस दान केले जाऊ शकतात अशी माहिती किरणला मिळाली. तिने आणखी माहिती काढली असता कॅन्सर ग्रस्तांसाठी काही संस्था काम करतात, याची माहिती तिला मिळाली. या संस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधला असता. या आजारामुळे ज्या व्यक्तींचे केस जातात त्यांना कृत्रिम केस लावले जाऊ शकतात, त्यासाठी केस दान केले जाऊ शकतात, असं तिला कळालं. ही माहिती मिळताच किरणने आपल्या डोक्यावरील केस दान करण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

 
Top