0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
राज्याच्या नव्हे देशाच्या राजकारणात भविष्यात सत्तेच्या लाचारी साठी कोणी पक्षांतर करणार नाही मंत्रीपदाच्या हावासापोटी राजकीय खेळ खेळणार नाही.रणनिती भाजपा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या चाणक्य नेत्यानी बांधली असुन त्यांचा मोहरा अजितदादा पवार पुढे केला असल्याचा संशय जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी व्यक्त केला आहे.मतदार जनतेच्या नावाने स्वताचं चांगभल करणारे नेते उमेदवारी मंत्री पदासाठी कसे पक्षाशी गद्दारी करतात त्यांना लगाम घालण्यासाठी स्वता केंन्द्रातील सत्ताधारी भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शहा,नितीन गडकरी,राष्ट्रवादी काँगे्रसचे शरद पवार,अहमद पटेल अन्य नेत्यानी घेतली असल्याची शकेता असल्याचे मत जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी व्यक्त केला आहे.जेथे सत्ता आहे तेथे सत्तेचा सारीपाठ नाही म्हणुन भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील मुंबई अध्यक्ष अशिष शेलार बोलत आहेत अन्य मंत्री नेते पुढे येवून बोलत नसल्याचे कळते.भाजपाने 170चा आकडा राष्ट्रवादीतुन बंड केलेल्या अजितदादा पवार किंवा भाजपाने त्याकडे सोपवला नाही तर भाजपामध्ये मंत्रीपदासाठी आलेल्या विखे पाटील गणेश नार्इक बबनराव पाचपुते नारायण राणे यांच्याकडे सोपवल्याचे सांगितल्याने आयाराम गयारामाना लगाम घालण्यास भाजपा राष्ट्रवादीच्या चाणीक्य नेत्याचा डाव असावं त्यांना सत्तेसाठी नाहीतर राजकारणातील आऊटगोईंग इंनकमीगला आळा घालण्यासाठी निर्णय तर घेतला नाही ती असं बोलणं योग्य ठरणार नाही अस मंत जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.सत्ता स्थापन करताना पहिल्यापासुन शेवटपर्यंत सेना काँगे्रस राष्ट्रवादी यांच्या तालमेल नव्हता त्यांचा फटका महराष्ट्राला बसला हे राजकीय नाटय संपवण्यासाठी अजितदादा पवार यांना भाजपा व राष्ट्रवादी नेत्यानी बाहेर काढल्याचे समोर येत आहे.ऑपरेशन लॉरस जबाबदारी पाचपुते विखे नार्इक राणे यांच्याकडे देवुन जनतेच्या रोशाला सामोरे जाण्याचा मार्ग आवलंबला असल्याचे समोर दिसते बहुमत भाजपा सिध्द करू शकत नाही.राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या बरोबर एकच आमदाराची संख्या आहे.त्यामुळे भाजपाची संख्याबळ 105 अधिक 15 अपक्ष एकुण 120 आणि अजित पवार 2 असे 122 संख्याबळ होते त्यामुळे महाविकास अगाडी सरकार स्थापन करेल यात शंका नाही.राज्यातील राजकीय धडामोडी जलत गतीने घडत आहेत.उदया निवडणुका लागल्या तर आयाराम गयाराम तसेच मंत्रीपदासाठी काहीही करणार्‍यांना धडा शिकवला जाण्याची शकेता आहे.अजितदादा पवार राष्ट्रवादीतुन बाहेर पडले तरी त्यांना भाजपा केंन्द्रात बळ देवू शकते त्यांचा फटका काँगे्रस राष्ट्रवादीला बसू शकतो भविष्यात अजितदादा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतो त्यांना भाजपा मदत करेल असे चित्र तयार झाले आहे.राज्याच्या दुष्काळी स्थितीत राजकीय घडामोडी निर्णयक नाहीत.राजकारणातील घराणेशाही थांबवण्याची परंपरा थांबवण्याचे प्रयत्न भाजपा राष्ट्रवादी करत असल्याचे कळते.सत्तेसाठी आमदाराना पकडुन आणता मग त्यांना आपला पक्ष उमेदवारी का देत नाहीत आमदाराना पकडुन आणु नका ज्याना कोणाला समर्थन दयायाचे त्यांना देवू दया एवढी हुकुमशाही सत्तासिहासना साठी कोणत्याही पक्षाने करू नये जनतेचा विकास काय करणार निवडणुकीपुर्वी आश्‍वसने दिलेली पाळणे कठीण असे शरदचंद्र पवार यांनी सातारा येथे सांगितले.मग जनतेला खोटे आश्‍वसने कशासाठी देता जनतेचा नांव पुढे करू नका पहिले.सरकार स्थापन करा शेतकरी बेरोजगारी संपवायाच आजचा राजनाटय खर्चात शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले असते.

Post a comment

 
Top