0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अकोला |
कला फाऊंडेशन संस्था पिंपलोद तालुका दर्यापुर जि.आमरावती यांनी 17 नोव्हेंबरला एक दिवशीय राज्यस्तरीय पहिले शब्दफुलोरा साहित्य संमेलन आयोजित केले आहे.युवा वर्गातील लेखन विश्‍वात सक्रिय असलेल्या युवा साहित्याकाना इतर साहित्य संमेलनातून पुरेसा सहभाग लाभत नाही त्याची पोकळी भरून निघावी या दृष्टीकोनातुन विदर्भातील प्रसिध्द असलेल्या मुर्तीजापुर साहित्य नगरीत साहित्यीक सांस्कृतीक अशा अनेकांच्या विचारात भर टाकणारे एक दिवशीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन जेष्ट साहित्यीक मनोहर नागे यांच्या अथ्यक्षतेखाली आयोजित केले आहे.
संमेलनात युवा लेखक कलावंताना निंमत्रीत करण्यात आले आहे.आयोजक समितीचे गणेश चौधरी,प्रविण धनबहादुर,विशाल दामले,श्रृषीकेश पंटागे,सुनिल थोरात ,गोपी वाघ,मंगलातार्इ ढोके,सुनंदा दामले,सोनल चौधरी यांनी सकाळी 10 ते 4 या कालावधीत तीन सत्रात कार्यक्रम आयोजित केले आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळयात विविध श्रेत्रातील मान्यवर कवीसाहित्यीक यांच्या हस्ते 37 जणांना पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.महाराष्ट्र गुजरात गोवा केरळ उत्तरप्रदेश बिहार राज्यस्थान आदि प्रांतात सामाजिक काम करणार्‍या विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योती नामदेव शेलार तसेच 30 वर्षे पत्रकारिता करून सामाजीक कार्य करणार्‍या जेष्ट पत्रकार नामदेव पांडुरंग शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.संपुर्ण महाराष्ट्रातील 37 जणांचा पुरस्कारात समावेश असुन नगरचे समाजसेवक सुनिल सकट यांनाही समाजभुषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.


Post a comment

 
Top