0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या माध्यमातून राज्याला नवे सरकार मिळणार असे वाटत असताना शनिवारी सकाळी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या. राजभवनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार पडलेल्या शपथविधीविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर रविवारी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुनावणी होणार आहे.
महा विकास आघाडी बनवून राज्य सरकार चालवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने व्यापक चर्चा केली. सायंकाळी सात वाजता उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असे तीनही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केले. या मुद्‌द्‌यावर आघाडीच्या वतीने सरकार स्थापनेचा दावा करण्यात येत होता. मात्र बिगर भाजपा सरकार येऊ नये म्हणून राजकीय यंत्रणांचा घटनाबाह्य वापर करत भारतीय जनता पक्षाचा दावा मान्य करण्यात आला, असा आक्षेप घेण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top