0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
महाराष्ट्रात एकीकडे सत्तास्थापनेवरुन रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे बेसुमार हाल होत आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार (Ajit Pawar ) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना फडणवीस सरकार 10 हजार कोटींची मदत देत आहे. ही अगदी तुटपुंजी मदत आहे, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.अजित पवार म्हणाले, राज्यभरात अवकाळी पावसाने नुकसान केलं आहे. त्यामुळे ही मदत कशालाही पुरणार नाही. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. ते सरकारमध्ये आहेत सूचना काय देत आहेत. त्यांनी थेट अंमलबजावणी करावी. नवीन सरकार येऊपर्यंत काळजीवाहू सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे. असं बोलून त्यांनी कातडी बचाव भूमिका घेऊ नये.

Post a comment

 
Top