BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
गोल्डन मुंबई
इंटरनेशनल फ़िल्म फेस्टिवल आणि सद्गुरु नॅशनल लघू चित्रपट यांच्या संयुक्त विद्यमाने
लघू चित्रपट महोत्सव सोहळा नुकताच गोखले रोड , दादर (प) येथे ज्येष्ठ कलाकार -नाटककार
-दिग्दर्शक सन्माननीय विजय गोखले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला ज्येष्ठ कलाकार दिवंगत विजू खोटे (हिंदी -मराठी
बॉलिवूड ज्येष्ठ कलाकार) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. GMIFF आणि सद्गुरु नॅशनल
चे डायरेक्टर माननीय संदीप मोरे यांनी विजय गोखले यांचे स्वागत करून शाल , श्रीफळ व
सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला , मोरे यांनी थोडक्यात प्रास्ताविक केले.त्याचप्रमाणे
महत्वाच्या लघू चित्रपटांचे सादरीकरण देखील या प्रसंगी करण्यांत आले.या प्रसंगी सन्माननीय
अतिथी ज्येष्ठ कलाकार -नाटककार -दिग्दर्शक विजय गोखले, संदेश कांबळे , बिपिन पटेल
, डी.प्रफुल्ल GMIFF आणि सद्गुरु नॅशनल चे डायरेक्टर संदीप मोरे , दिग्दर्शक -पत्रकार
महेश्वर तेटांबे , अभिनेता सुरेश डाळे-पाटील आदी कर्मचारी मान्यवर उपस्थित होते. आपल्या
अतिथीपर भाषणांत नाटककार गोखले यांनी उपस्थित शॉर्ट फ़िल्म मेकर्स ना मोलाचे मार्गदर्शन
केले " कला आणि विद्या" हे दोन्ही
परस्परविरोधी आहेत " तेव्हा या दोघांचा
मतितार्थ समजून घ्या. नुसत्या शॉर्ट फ़िल्म न बनविता कथानक हृदयापर्यंत कसे पोहोचेल
अशी रचना करा , शॉर्ट फिल्म्स मध्ये अश्लील , बीभत्स याचा शिरकाव न करता कथेमध्ये जिवंतपणा
आणा .गोखले यांनी कवी कुसुमाग्रज , नाटककार दारव्हेकर मास्तर , ज्येष्ठ साहित्यिक
-नाटककार पु.ल.देशपांडे यांचे दाखले देऊन उपस्थितांची मने जिंकून घेतली. या महोत्सवात अनुक्रमे सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा
"मैं गायत्री जाधव", सर्वोत्कृष्ट मल्याळम "चॉईस" , सर्वोत्कृष्ट
मराठी लघू चित्रपट "झप्पी" आणि
"कॅनव्हास" ,सर्वोत्कृष्ट माहितीपट "एक थेंब निसर्गाचा आणि सर्वोत्कृष्ट संकल्पना "ऊर्जा" इत्यादी लघू चित्रपटांना मानांकन
प्रदान करण्यांत आली. सोहळ्याच्या अंतिम GMIFF आणि सद्गुरु नॅशनल चे डायरेक्टर संदीप
मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून या लघू चित्रपट महोत्सवाची सांगता केली.
Post a comment