0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
भारतीय पुलीस सेवचे वरिष्ठ अधिकारी डॉ. बी जी शेखर (IPS), DIG SRPF महाराष्ट्र यांना आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाच्या आंतरिक भव्य प्रांगणांत राष्ट्रीय मराठा मिशन तर्फे  शिवशंभू किर्तीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पोलीस सेवेत अतुलनीय साहसी कार्य तथा भारतीय तरुण पिढीसाठी प्रेरणादायी लेखन कार्य केल्यामुळे श्री. कमलेश पाटील, संस्थापक संयोजक, राष्ट्रीय मराठा मिशन  यांच्या हस्ते आज डॉ. बीजी शेखर यांना शिवशंभू किर्तीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मिशनचे पदाधिकारी श्री. विष्णु पाटील, उद्योजक तथा प्रख्यात समाजसेवक, वरिष्ठ संस्थापक सल्लागार महाराष्ट मंडळ, गुडगाव हरयाणा, प्रो. इजि. रंणजीत ठिपे पाटील, प्रो. उत्तम कोर्राम, प्रो. पंकज कणसे, प्रो. गोवर्धन सर, श्री. नीलेश देशमुख पाटील उपस्थित होते.
   डॉ. शेखर सर, महाराष्ट्र शासनातील व भारतीय पोलीस तथा प्रशासकिय सेवा क्षेत्रातील प्रथम व्यक्ति आहेत त्यांनी क्रीमिनालॉजी वर संशोधन करुन डॉक्टरेट उपाधी प्राप्त केली आहे. या क्षेत्रात बंगालमधील एक सदस्याने डाक्टरेट प्राप्त केली आहे. याशिवाय डॉ. शेखर जी आता सार्वजनिक वाहतूक रहदारी क्षेत्रात संशोधन कार्य पार पाडीत असून सोबतच यावर पीएचडी करीत आहेत. ज्यामुळे राष्ट्रीय सार्वजनिक वातहूक सुरक्षेत मानवीय योगदान देण्याचा प्रयत्न  करीत आहेत.डॉ. शेखर यांच्याकडून आतापर्यंत सात पुस्तके लिहिली गेली आहेत. अनुक्रमे प्रतिबंध, शोध, प्रतिशोध, प्रबोधिनी संकेत, पोलीस अंमलदारांची कर्तव्य, राणजुही, पोलीस पाटलांची कर्तव्य, आणि आता युध्दतंत्रातील गनिमा कावा युध्दनीती चे सरसेनापती संताजी घोरपडे या पुस्तकाचे संशोधनपर पुस्तक लिहित आहेत. हे पुस्तक भारतीय सेनेसाठी उपयुक्त  व दिशादर्शरक ठरेल अशी आशा आहे.
      याशिवाय डॉ. शेखर यांना राष्ट्रपती पोलीस पुरस्कार, यूएन मेडल, बेस्ट डिटेक्शन इन महाराष्ट्र राज्य, 171 रिवार्ड्स आणि  प्रशस्तीपत्र, डीजीपी गोल्ड मेडल्स इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Post a comment

 
Top