BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
|
बॉलिवूड अभिनेत्री
शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले
आहेत. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय असल्याची माहिती अंमलबजावणी
संचलनालय अर्थात ईडीच्या सूत्रांनी दिली .
अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत राज कुंद्रा यांनी व्यावसायिक करार केल्याचा संशय
ईडीने व्यक्त केला आहे. या प्रकरणी ईडी राज कुंद्रा यांची सोमवारी (4 नोव्हेंबर) चौकशी
करणार असल्याचीही माहिती आहे, त्याबाबत ईडीने राज कुंद्रा यांना समन्स पाठवल्याचंही
सांगितलं जात आहे. मात्र, राज कुंद्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत
Post a comment