0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्यातील बारवी धरणाची उंची वाढवण्यात आल्याने आदिवासी कातकरी वाडीच्या समस्या वाढत असुन अनेक संकटांचा सामना करीत असतानाच एका फार मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे.प्रचंड प्रमाणात वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रहदारी साठी होडीचा वापर करावा लागत असुन  विजेचे खांब पुर्णपणे उखडून गेल्याने गेली पंधरा दिवस बारवी धरण बुडीत क्षेत्रातील आदिवासी वाड्या अंधारात चाचपडत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था म्हणून जनरेटर देण्यात आला परंतु तोही जुना असुन बंद अवस्थेत आहे.विज नसल्याने ओढ्याचे गढुळ व दुषीत पाणी पिल्याने अनेक आदिवासींना साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे.खेद जनक बाब म्हणजे सर्व पक्षांचे पदाधिकारी तसेच नेते मंडळींनी या आदिवासी कातकरी बांधवांन कडे पाठ फिरवली असुन आपल्या उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत कसा विजयी करता येईल याच्यातच मशगुल असुन औद्योगिक विकास महामंडळ सुध्दा लक्ष देत नसल्याने आदिवासी कातकरी बांधवांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

Post a comment

 
Top