0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानातील झाले कापण्यात आली आहेत. सुमारे 10 ते 12 झाडांवर कुऱ्हाडी चालवण्यात आल्या आहेत. गुरुवारी मोदी यांची सभा एस. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. मैदानात समोरच्या बाजूला व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान व्यासपीठ उभारण्यात अडथळा येत होता. यामुळेच ही झाडे तोडण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे पर्यावरण प्रेमींसह नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Post a comment

 
Top