BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा संघर्ष शिगेला
पोहोचला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द कधीच दिला नाही, असं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं, यानंतर युतीतील संबंध ताणले गेल्याची
माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये
होणारी बैठक रद्द झाली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि सुभाष देसाई या बैठकीला
जाणार होते, पण आता शिवसेनेकडून बैठकीला कोणीही जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी
केलेल्या त्या विधानाचा खुलासा होण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेने मांडले आहे.
Post a comment