0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी पगार देण्याचा निर्णयावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे येत्या 25 ऑक्टोबर पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच सरकारने याबाबतचे नवे परिपत्रक जारी केले आहे.बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी म्हणजेच 25 ऑक्‍टोबरच्या पूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. लेखा कोषागार विभागातील कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने वित्त विभागाला आगावू पगार करता येणार नसल्याचं कारण देण्यात आलं होते. यामुळे अनेक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार असल्याचे चित्र होते.मात्र नुकतंच ही स्थगिती उठवत राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक जारी केले होते. यात महाराष्ट्र कोषागार नियम आणि मुंबई वित्तीय नियमांमधील काही नियम शिथिल करावेत. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आगावू पगार द्यावा असे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची कडू झालेली दिवाळी गोड होणार आहे.

Post a comment

 
Top