0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
विधानसभा निवडणूक प्रचारानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांची जाहीर सभा उल्हासनगर येथील गोल मैदान येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस आणि शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या महायुती मित्रपक्षांच्या लोकप्रतिनीधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज्यात पुन्हा एकदा महायुतीचीच सत्ता येणार आहे, त्यामुळे सर्वांनी मिळून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार करताना गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे घेतलेले धोरणात्मक निर्णय, केलेली विकास कामे आणि नागरिकांसाठी राबवत असलेल्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम एकदिलाने आणि मोठ्या जोमाने करण्याचे आवाहन केले.


Post a comment

 
Top