0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा मिळवत सत्ता स्थापनेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीला चांगलाच फटका बसला आहे. मतमोजणीत दोन्ही पक्षांच्या जागा कमी झाल्यामुळे, राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लोकसभेआधी ठरवलेल्या 50-50 फॉर्म्युल्याप्रमाणे होईल असे स्पष्ट संकेत दिले आहेत.दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा एक वेगळाच अंदाज आज पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. लोकसभेनंतर 50-50 चं सूत्र ठरलं होतं. आता त्या सूत्राप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत बैठक घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलंय.निवडणुकीत हार जीत होत असते. महाराष्ट्राने महायुतीला सत्तास्थापन करण्याएव्हढ्या जागा दिल्यात. ज्या चुका झाल्यात, त्या चुका परत होणार नाही. याची काळजी घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. येत्या पाच वर्षात अत्यंत जबाबदारीने काम करणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हंटले. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचं अभिनंदन केलंय. विरोधकांनी गेली पाच वर्ष झोपेत घालवली. आता झोपू नका, म्हणजे आमच्यावरचा ताण कमी होईल असंही उद्धव ठाकरे म्हणलेत.

Post a comment

 
Top