0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
राज्यात राष्ट्रवादीतील मातंबर नेते भाजपासेनेत दाखल झाले.राज्यात सत्ता बहुमतांनी येर्इल अशी आरोळी दिली जाते अशा वातावरणात ज्या मुरबाड विधानसभेत राष्ट्रवादी काहीही उरलं नाही,कार्यकर्ता उरला नाही तेथे भाजपाच्या विरोधात राय्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव कातो की टक्कर देत आहेत हे बळ कशाचे...ना कार्यकर्ता ना करविता,मार्गदर्शक निवडणूक रचना सांभाळण्यात,मागे कोणी नसताना लढतो तो शुर मात्र,प्रमोद हिंदुराव दानशुर आहेत त्यांना सहानुभुतीची एकता साथ देते अशा शब्दात प्रचार दौर्‍यात आशिर्वाद मतदार ज्येष्ठांकडून दिला जात आहे.ज्यांना ज्यांना सकाळी सहावाजल्यापासून रात्रौ 2 वाजेपर्यंत 30 वर्षे दानशुराची मदत दिली अशा लोकांची सहानुभुती प्रमोद हिंदुराव यांना लाभल्याचे प्रत्येक सामान्य माणुस बोलतांना दिसत आहे.
            रस्त्यावरचा मच्छीवाला फेरविाला भाजीवाला,पानपट्टीवाला,खारीवाला,फुडवाला, फुलवाला, दुधवाला,पाणीवाला,वडापाववाला यापेक्षा प्रत्येक अदचणीतल्या माणसाला दवाखाण्यापासून लग्न, पुजा, उत्तरकार्यापर्यंत खिशात हात घालून आले ते देण्याची ज्ञात असणारं नेतृत्व म्हणुन त्यांच्या प्रचारात सहानुभुतीचा उच्चार केला जातो हे वास्तव आहे.
            डागदार नाही,दमदार नेता त्यांच प्रचार सिंबॉल खरं आहे.त्यांनी कधी कोणाला रडवलं नाही तर घडवलं मात्र,सार्इबाबाचा भक्त,परमार्थिक आवड असलेला नेता सर्व जातीधर्माच्या लोकांना समजावुन घेतो,जवळ बसतो याच आठवणी प्रचारात काढल्या जात असल्याने वयोवृध्द माणसं त्यांच्या बरोबर प्रचारात रंगले आहेत.
            निवडणूका येतील आणि जातील मात्र,आपल्या तालुक्यातील माणसाला राज्याच्या देशाच्या नेतृत्वासमोर घेऊन जाणारे त्यांची बाजू घेणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणून प्रमोद हिंदुराव यांच्याकडे पाहिले जात आहे.हाच त्यांचा बुजुगात प्रचाराचा मुद्दा ठरत आहे.


Post a comment

 
Top