0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
राज्याच्या राजकारणात मुरबाडचे राजकारण वेगळेच रंग भरून जातो तसाच रंग येत्या  निवडणुकीत उधळणार असून सत्ताधारी भाजपासेना युतीवर नाराज असलेल्या मतदार कार्यकर्त्याना राष्ट्रवादीने नवा दिग्गज चेहरा दिला असून येथील निवडणुक काटोकी टक्कर मानली जाणार आहे.अशी एकास एक निवडणुक गेल्या 10 वर्षातुन पुन्हा एकदा होत असून राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपाने लावलेला सुरूंग राष्ट्रवादी त्यांचा स्फोट यावेळी करणार असल्याची चर्चा असून सेनेत गेलेल्या राष्ट्रवादीमय  कार्यकर्त्यांचा कल कट्टर विरोधक भाजपा उमेदवाराकडे जातो की राष्ट्रवादीकडे वळतो याकडे मतदारांचे डोळे लागले आहेत.मुरबाडचे गोटीराम पवार यांच्या साम्राज्याला दोन वेळा पराभवाचा डाग लागला त्यांचा वचवा राष्ट्रवादीच्या माध्यमातुन भरून काढणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिले आहे.भाजपा सेना राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार अशी चर्चा असताना उमेदवारी साठी  गेलेल्या राष्ट्रवादीमय धारकांची नाराजी झाली भाजपा सेना युती झाली आणि सेनेत गेलेल्यांची अपेक्षा भंग झाली ज्या राष्ट्रवादीला ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती जिल्हापरिषदेत भाजपा मधुन गेल्या 5 वर्षात शह दिला त्यांचाच काम करण्याची वेळ सेनेत उमेदवारी मिळवून घेण्यासाठी गेलेल्यावर आल्याने त्याची मदत भाजपाला होर्इल का राष्ट्रवादीला हे  हाळु हाळु बदलू लागले असुन ज्यांना पाडण्यासाठी धडपडणारे येत्या निवडणुकीत त्यांना निवडुण देण्यासाठी किती कसरत करतात हे यावेळी स्पष्ट होणार आहे.

Post a comment

 
Top