0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
ज्या माणसाला सामान्य सर्व सामान्य माणसाची जाण आहे.माणुसकी हा त्याचा धर्म आहे.त्याच्यासाठी विजय धावुन येतो त्यांना विक्रमाची गरज भासत नाही असाच माणुसकीचा विजय कल्याणचे शिवसेना आमदार विश्‍वनाथ (दादा) भोर्इर यांचा झाला आहे.कल्याण सारख्या सवेदन शहरात शहरप्रमूख यशस्वी सांभाळले ग्रामीण भागातील लोकांशी त्यांची नाळ जोडलेली होती प्रचंड चाहातावर्ग आपुलकी आणि माणूसकीचा वटवृक्ष अशी ओळख असणारा दादा म्हणजे विश्‍वनाथ भोर्इर यांच्या विजयाने कल्याण ग्रामीण टिटवाळा सह मुरबाड भिवंडी तालुक्यात त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.निवडणुकी पुर्वी तिकिटाची मागणी पुढे आली मातोश्रीवर एबी फार्म मिळाला त्याचवेळी आम्ही म्हंटल होतं दादा तुमची गरज आहे.आज ती गरज पुर्ण झाल्याचा समाधान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया जेष्ट पत्रकार नामदेव शेलार नांदपचे शाखाप्रमुख वसंत भगत यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

Post a comment

 
Top