0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
निवृत्त कर्मचारी १९९५ समन्वय समिती.तर्फे १० ऑक्टोबर सकाळी ११ ते १ पर्यंत, ६५ लाख प्रलंबित पेन्शनर ज्येष्ठ नागरिकांचे इपीएफओ आणि केंद्र सरकारच्या पेन्शनर विरोधी धोरणाबाबत निषेध व्यक्त करून पेन्शन वाढीसाठी संपूर्ण भारतभर सात हजार भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर कोशियारी कमिटी अहवाल लागू करा,३१ मे २०१७ चे सर्कुलर सर्क्युलर रद्द करा ,किमान पेंशन रु ९००० करा या प्रमुख मागण्यासाठी या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन व निदर्शने करण्याचे निश्चित केले आहे त्यानुसार मुंबईत येणारी ४ कार्यालये १) इपीएफओ कार्यालय वरदान कॉम्पलेक्स वागळे इस्टेट, ठाणे. २) चारकोप, कांदीवली. ३) वाशी, नवी मुंबई व रायगड आणि मुख्य कार्यालय, वांद्रे. या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे असे ठाणे जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे विष्णू फडणीस, रायगड पेन्शनर असोसिएशनचे शिवाजी भोसले, समन्वय समिती मुंबई अध्यक्ष विनायक गोडसे, कार्याध्यक्षा प्रिया परब, ठाणे जिल्हा अध्यक्ष विकास कुलकर्णी, ठाणे शहर संपर्क प्रमुख अविनाश लोवलेकर, कल्याण शहराचे जयंत पाटणकर, कल्याण तालुका जयंत खरे व समन्वय समितीचे केंद्रीय सल्लागार सुधींद्र नंजनगुड यांनी कळवले आहे 

Post a comment

 
Top