0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
उल्हासनगर म्हणजे बनावट वस्तुचा माहेरघर परंतू येथील बनावट वस्तुंच्या कारखाण्याकडे सरकारने लाचखोरीने दुर्लक्ष केल्याने सामान्यापासून श्रीमंत वाहनचालक मालकाची बनावट वस्तु देऊन दररोज लाखो रूपयांची लूट केली जाते याकडे केंद्र व राज्य सरकार लक्ष घालणार काय ? असा सवाल संतप्त वाहनचालकांनी केला आहे.
            उल्हासनगर शहरात वाहने दुरूस्ती करणारे अनेक गॅरेज आहेत.त्या गॅरेजामध्ये वाहनाचे बनावट स्पअरपार्टस बसवले जातात.बनावट बिले दिली जातात.जी.एस.टी नंबर खोटे असतात याची चौकशी शासनाने करून लाखो रूपये वाहनाची नास्धूस करणार्‍या तसेच वाढत्या अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या स्पेअरपार्टस दुकानदार,गॅरेज दुकानदारावर कठोर कारवार्इ करावी त्यांना किमतीची मर्यादा घालावी तसेच कंपनीच्या नावे बनावट स्पेअरपार्टस वस्तु विक्री करण्आर्‍या दुकानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.
            वाहनाचे वाढते अपघात त्यामध्ये होणारी मोठया प्रमाणात मनुष्य हाणीस हेच बनावट स्पअरपार्टस धारक जबाबदार असून बनावट बिले देऊन शासनाचाही कोटी रूपयांचा कर हे दुकानदार बुडवत आहेत.केवळ महानगर पालिकेच्या परवान्यावर चाललेली दुकाने यांचाही पसारा वाढला आहे.

Post a comment

 
Top