0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात शिवसेना - भाजपमधील सत्तावाटपाचा गुंता एकीकडे वाढत चाललाय, परंतु दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसानही झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे राज्यात लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या ओला दुष्काळसदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी दौरा करणार आहेत.विशेषकरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांत, कोकणात अतिमुसळधार पावसाने भातशेतीचं मोठं नुकसान केलंय. कापणीच्या वेळीच पावसाच्या तडाख्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेलं उभं पीक वाया गेलंय. याच ओल्या दुष्काळग्रस्त भागात आदित्य ठाकरे दौरा करणार आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणीही करणार आहेत.

Post a comment

 
Top