0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतावादी संघटनेचे सदस्य होते. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर नासिर चद्रूलाही कंठस्नान घालण्यात आले आहे.आज सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील बिजविहाराच्या पाजलपुरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक होती. दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु होता. सुरक्षा दलाने दहशदवाद्यांना घेरले होते. यावेळी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यानंतर अखेरीस लष्कराचे जवान तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यशस्वी झाले आहेत. 

Post a comment

 
Top