BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरिता दिनांक 21 ऑक्टोबर,2019 रोजी लोकप्रतिनिधीत्व अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने
व आस्थापना वगळून सर्व दुकाने,आस्थापना,कारखाने येथील कामगार,कर्मचारी व अधिकारी यांना
त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याकरिता पगारी सुट्टी देण्यात येत आहे. सदर सुट्टीच्या
दिवसाचा पगार कपात करण्यात येवू नये. अत्यावश्यक सेवा, दुकाने व आस्थापना वगळून सर्व
आस्थापना मतदानाच्या दिवशी सकाळी 7.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळात बंद ठेवण्यात याव्यात.
जेणेकरुन जास्तीत जास्त नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील.
संबंधित व्यवस्थापकांनी वरील सूचनांचे
योग्य ते अनुपालन करावे, याबाबत कामगार किंवा कामगार संघटनांच्या तक्रारी असल्यास त्यांनी
संबंधित कामगार उप आयुक्त यांचे कार्यालयाशी
किंवा उप संचालक, औद्योगिक सुरक्षा संचालनालय, ठाणे यांच्याशी संपर्क साधून
तक्रार नोंदवावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास
मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास सदर आस्थापनांविरुध्द योग्य ती कार्यवाही
करण्यात येईल.
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत
येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखान्यांच्या मालकांनी, व्यवस्थापनांनी वरीलप्रमाणे मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या सूचनांचे
योग्यरित्या पालन करण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन कामगार उप आयुक्त, ठाणे यांचे
मार्फत करण्यात आले आहे.
Post a comment