0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – श्रीनगर |

जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा असूनही, अतिरेकी खोऱ्यात सक्रिय आहे. श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) सैनिकांवर ग्रेनेड फेकून अतिरेकी फरार झाले आहेत. श्रीनगरच्या करण नगर येथे असलेल्या काकसराये भागात झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे 6 जवान जखमी झाले.जखमी जवानांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाला लक्ष्य करताच सीआरपीएफच्या जवानांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. संपूर्ण सुरक्षा बंदोबस्तासह करण नगर भागात सुरक्षा दलाने सुरक्षा वाढविली आहे.

Post a comment

 
Top