0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबर्इ  |
अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या अर्कांसास राज्याचे गव्हर्नर एसा हचिंसन यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.अर्कांसास हे भात शेती आणि कापूस उत्पादनात देखील अग्रेसर आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्राला सहकार्य करण्यास अर्कांसास तयार असल्याचे एसा हचिंसन यांनी यावेळी सांगितले.अर्कांसास येथे मुख्यालय असलेल्या वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय कंपनीच्या भारतात 27 शाखा असून भारतातील वेलस्पन तसेच अनेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या देखील अर्कांसास राज्यात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र व अर्कांसासमध्ये सहाकार्याचे पर्व सुरु झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

Post a comment

 
Top