0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा(Raj Kundra) यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) तब्बल साडेनऊ तास कसून चौकशी केली. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा ईडीला संशय असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ही चौकशी करण्यात आली. कुंद्रा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीसोबत व्यावसायिक करार केल्याचा आरोप आहे. मात्र, राज कुंद्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

Post a comment

 
Top