0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावर रविवारी (13 ऑक्टोबर) मेगाब्लॉक घेण्यात येत आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येत आहे.मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड या रेल्वे स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील जलद मार्गावरील मेगाब्लॉक रविवारी सकाळी 9.53 ते दुपारी 2.42 पर्यंत घेण्यात येईल. यादरम्यान सीएसएमटीहून कल्याणला जाणाऱ्या जलद गाड्या या सायन ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. यादरम्यान त्या सर्व स्थानकांवर थांबतील.

Post a comment

 
Top