0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले उड्डाण पुलावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकने टॅक्सी आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत. ट्रकचालक भरधाव वेगाने ट्रक चालवत होता. त्यावेळी त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. मात्र, ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. 

Post a comment

 
Top