BY - युवा महाराष्ट्र लाइव – सांगली |
सांगलीतील मध्यवस्तीत असणाऱ्या मेहता जनरल स्टोअर्सच्या
गोडाऊनला काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मेहता स्टोअर्स सह
आजूबाजूची चार दुकाने भस्मसात झाली. आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण
आणण्यासाठी सांगली सह, तासगाव, जयसिंगपूर, आष्टा येथील तब्बल आठ फायर फायटर
बोलावण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू
होते.सांगलीच्या मारुती रोडवरील मेहता स्टोअर्स मध्ये प्लास्टिक साहित्य
विक्रीचे दुकान आणि मागील बाजूला गोडाऊन आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास या
गोडाऊन मधून धूर येऊ लागला आणि अचानक आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये मेहता
स्टोअर्सच्या गोडाऊनसह आजूबाजूची तीन मोठी दुकाने भास्मसात झाली. यावेळी
महापालियाक अग्निशामक विभागाच्या अग्निशामक गाड्यानी ही आग आटोक्यात आणायचा
प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. यावेळी तब्बल आठ ते दहा अग्निशामक
बंबाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू होते. मात्र उशिरापर्यंत आग
आटोक्यात येत नव्हती. यामुळे आजूबाजूच्या नगरपालिकांच्या अग्निशामक बंबाना पाचारण
करण्यात आले. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक विभागाकडून शर्थीचे प्रयत्न
सुरू होते. अखेर रात्री 10 वाजता लागेलली आग मध्यरात्रीच्या सुमारास आटोक्यात
आणण्यात यश आले.
Post a comment