0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
समता नगर येथील पॅटरन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आँचल व्होकेशनल सेंटरमधील विशेष मुलांनी,त्यांच्या ,पालकांनी ,शिक्षकांनी मिळून खास दिवाळी, सणाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या पणत्या, रांगोळ्या, स्वस्तिक, गणपती, पाउले, कलश, मोमेनटो वॉलपीस कापडापासुन तयार केलेली गुलाबाची फुले, सी.डी.दीया, पलोटींग कॅनडल, डेकोरेटीव्ह एनवहलप, तोरण,ई वस्तू साकारल्या आहेत. वस्तु तयार करताना मुलांना होणारा आनंद हा अवर्णनीय असतो इतर मुलांपेक्षा या विशेष मुलांचे काम कमी वेगाने होत असल्यामुळे त्यांना साकारताना अधिक वेळ लागतो. म्हणून गेल्या काही दिवसांपासूनच हे काम सुरू करण्यात आले आहे.या मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण वेळोवेळी त्यांना दिले जाते. याचाच एक भाग म्हणून सोमवार दि १४ ऑक्टोबर २०१९ दु २ ते ४ दिवाळी सजावट साहित्य कार्यशाळा आँचल व्होकेशनल सेंटर, समता नगर वेलफेअर सेंटर, कुसुमाग्रज रोड, समता नगर, ठाणे (प).येथे आयोजित केली आहे. मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन १४ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर पर्यंत समता नगर वेलफेअर सेंटर येथ लावण्यात येणार आहे.ह्या वस्तु विक्री करून मिळणाऱ्या नफयामधून मुलांना दिवाळीचा बोनस म्हणुन काही रक्कम दिली जाणार आहे. गिफ्ट म्हणून मिळणारी ती छोटीसी रक्कम मुलांसाठी फार मोठी असते व त्याहीपेक्षा त्यंच्या चेहर्‍यावरील आनंद हा फार मोठा असतो. आपल्या मुलांनाही सर्वसाधारण मुलांसारखे जगता यावे अशी त्यांच्या पालकांची अपेक्षा असते. समता नगर येथे पॅटरन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आँचल व्होकेशनल सेंटर गेल्या काही वर्षांपासून विशेष मुलांसाठी संस्था चालवित आहे .ही विशेष मुलांची संस्था मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सर्वतोपरीने सहाय्य करते. संस्थेमध्ये सध्या सुमारे तेवीस विद्यार्थी आहेत.या प्रदर्शनातून खरेदी करून त्यांना समान संधी द्यावी अशी माहिती अध्यक्ष बलदीप डोगरा आँचल व्होकेशनल सेंटर संचालिका ईश्वरी गुलरजनी यांनी दिली आहे 


Post a comment

 
Top