0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – श्रीनगर |
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल 70 दिवसांनंतर आजपासून मोबाइल फोनची सेवा सुरू होईल. दुपारी 12 वाजता 40 लाखांहून अधिक मोबाइल फोन अॅक्टिव्हेट होणार आहेत. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच पोस्टपेड सेवांवरून बंदी हटवण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारपासून मोबाइल पोस्टपेड सेवा बहाल केल्या जातील. सरकारने सध्या पोस्टपेड मोबाईलवर कॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाइल इंटरनेटसाठी जनतेला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. याद्वारे नंतर प्रीपेड सेवेबाबत निर्णय घेण्यात येईल. जम्मू-काश्मीरला ऑगस्ट महिन्यात विशेष दर्जा देण्यात आलेले कलम-370 रद्द केल्यावर खबरदारी म्हणून काश्मीरमध्ये मोबाइल फोनसेवा आणि इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली.या काळात जम्मू आणि लडाख प्रदेशात मोबाइल फोनसेवा उपलब्ध असल्या, तरी काश्मीर खोऱ्यात 5 ऑगस्टपासून यावर बंदी होती. श्रीनगरमधील माध्यमांशी बोलताना राज्य सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल म्हणाले, खोऱ्यात एकूण परिस्थिती सुधारल्यानंतर सोमवारी सकाळपासून पोस्टपेड मोबाइल फोनसेवा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

Post a comment

 
Top