0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या सर्व कार्यकर्त्यांचा मी अंतकरणापासून आभारी आहे. या निवडणुकीमध्ये दिसतेय की, लोकांना सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही. सत्ता येते सत्ता जाते पण जमीनीवर पाय ठेवून काम करण्याची अपेक्षा लोकांना असते. हेच या निवडणुकांमधून समोर आले आहे असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वात पहिले ही प्रतिक्रिया दिली आहे.- साताऱ्यातील लोकांचे मी मनापासून आभार मानतो. साताऱ्याला जाऊन तिथल्या मतदानांचे मी विशेष आभार माननार असल्याचे पवार म्हणाले. उदयनराजेंनी गादीचा मान राखला नाही म्हणून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.- पक्षांतर केलेल्या लोकांना जनतेने कौल दिलेला नाही.

Post a comment

 
Top