1
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
‘आम्हाला सत्ता दया आम्ही शिवरायांच्या तत्वाचा राज्य करू असे म्हणणार्‍या भाजपा मुख्यमंत्री यांच्या कालावधीतच मुरबाड म्हसा पाठगांव (कर्जत) रस्त्यावर तात्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी 20 कोटीच्यावर भ्रष्टाचार केला आहे.त्याची र्इडी मार्फत चौकशी करण्याची मांगणी केले होती.सदर तक्रारीकडे भाजपासेना सरकारने दुर्लक्ष करून निवडणुक फंड वसुल केल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.52 कोटी रूपये खर्च झालेल्या मुरबाड म्हसा पाठगांव कर्जत रस्त्यावर केंन्द्र सरकारने 800 कोटीचा रस्ता बनवण्यास घेतला असुन नविन रस्ता उखदुन त्याची डांबर माती भराव करून नवा काँक्रेटीकरण सुरू केला आहे.सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन गुणवंता विभागाचे अधिकारी टक्केवारी घेवुन दुर्लक्ष करत आहेत.ठेकेदार भाजपासेना युतीचे मित्र असुन लोकप्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री कारवार्इ करत नाहीत.या कामाचीे तक्रार स्वता येथील स्थानिक खासदारानी केली होती अशा भ्रष्टाचाराला भाजपा सेना युतीने पाठबळ दिला आहे.या कामाची चौकशी करून तात्काळ कारवार्इ करावी काम करणार्‍या एजंन्सीला काळया यादीत टाकण्यात यावे अशी मांगणी होत आहे.

Post a comment

  1. Ashya kamamule gadya bhangar zalyat Dhhikkar aahe contractor Officers cha kalank aahet Bhart deshala aamdar khasdar fakt Mate magayla

    ReplyDelete

 
Top