0
BY - युवा महाराष्ट्र लाइव - उरण |
उरण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार श्री.महेश रतनलाल बालदी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.दि.११/१०/२०१९ रोजी मतदार संघात प्रचाराच्यावेळी त्यांच्याच सोशल मिडियावर व्हाईरल झालेल्या विडिओ मधील वक्तव्यात स्पष्टपणे म्हटले आहे कि,' तुम्ही मला मत देणार आहात का मुलगी ? जात बघायला " या वादग्रस्त विधान करुन स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी, कोळी, कराडी मतदार महिला भगिनी यांच्या बद्दल जातिवाचक अपशब्द वापरून निंदा केली आहे.त्यामुळे समाजामध्ये आक्रोश निर्माण झालेला असून समजाच्या भावना दुखावल्या आहेत.यासंदर्भात दि.११/१०/२०१९ रोजी उरण पोलिस ठाण्यात आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे लेखी तक्रार केली असून भा.दं.वि. कलम ४९९,५०४,५०५ अन्वये चौकशी करुन गुन्हा दाखल करुन अटक करण्याबाबत  अर्ज दाखल केला आहे. याबाबत आगरी कोळी समाजाचे नेते श्री जयेन्द्र दादा खुणे यांच्याशी संपर्क साधता त्यांनी या प्रकरणाबाबत म्हटले कि,'आगरी कोळी कराडी समाजाबद्दल अपमान कारक ,विकृत,टवाळकी,विनोद बनवून त्यांची निवडणूक प्रचारात वापर केल्याप्रकरणी तसेच स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी कराडी महिलांचा अपमान केल्याबद्दल व  आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी. तसेच जाती-धर्मविषयक आचरट विनोद पसरविणाऱ्या वेळीच कारवाई झाली पाहिजे.आगरी कोळी कराडी समाजाची टिंगळ  टवाळी सहन केली जाणार नाही.आपल्या समाजामधील मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून महिलांची निंदा केली. म्हणून समाजामध्ये असंतोष व आक्रोश निर्माण झाला आहे.तसेच स्थानिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.  त्यामुळे महेश बालदी यांचा निषेध करण्यासाठी स्थानिक आगरी,कोळी,कराडी समाज बांधव व भगिनिंनी दिनांक.१२/१०/२०१९ रोजी संध्याकाळी ४:००वा. उरण बस स्टँड येथे मोठ्या संख्येने एकत्र जमावे.आगरी,कोळी,कराडी,सर्व संस्था ,संघटना,मच्छीमार व इतर सामाजिक संघटना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.असे म्हणाले.
टीप : कोणीही कोणत्याही पक्षाचे झेंडे सोबत आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a comment

 
Top