0


BY - युवा महाराष्ट्र लाइवनवी दिल्ली |
देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. घराघरात आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा प्रकाशाचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवीन प्रकाश घेऊन येवो आणि आपला देश नेहमी सुखी, समृद्ध राहो, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी दिवाळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देत ट्विट केले. 'देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन येवो आणि आपला देश नेहमी सुखी, समृद्ध राहो,' असं ट्विट करत मोदींनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही देशवासियांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 'दिवाळीनिमित्त सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी सर्व प्रेम, सहानुभूती आणि एकोप्याचा दीपक प्रज्ज्वलित करून सर्वांच्या, खासकरून गरजवंतांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करूया!,' असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


Post a comment

 
Top